पंकजाताई मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे. धनंजय मुंडेंची भावनिक आवाहन

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. त्यानंतर पंकजा मुंडे यांचे भाऊ आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतरचे आपले अनुभव शेअर करत पंकजा यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
‘मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे,’ अशी माहिती ट्विटरवरून पंकजा मुंडे यांनी दिली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी कोरोना विषाणूच्या त्रासाबाबत माहिती देत पंकजा यांना आवाहन केलं आहे की, ‘पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.’
पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे. https://t.co/pea5Q99xT4
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 1, 2020










