अखेर पुणे महापालिका हद्दीतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची वगळले; शासनाने जाहिर केली पुणे मनपाची सुधारित हद्द

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांना वगळण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश राज्य शासनाचे उप सचिव अनिरूध्द जेवळीकर यांनी आज काढले आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये 11 गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये देवाची उरुळी आणि फुरसुंगी या गावांचा समावेश होता. परंतु नुकतेच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दोन गावे वगळण्याचा निर्णय घेतला. महापालिका कुठल्याही सुविधा देत नाही. त्यातुलनेत मिळकत कर प्रचंड प्रमाणात आकारला जात असल्याने ही गावे वगळण्याची मागणी विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.

पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळावयाचे क्षेत्र –
फुरसुंगी – स.नं. 193, 192 पै, 194, 195 पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपुर्णमहसुली गावाचे क्षेत्र
उरूळी देवाची – स.नं. 30,31 व 32 पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपुर्ण महसुली गावाचे क्षेत्र
पुणे महानगरपालिकेची सुधारित हद्द (Pune PMC News)
उत्तर – कळस, धानोरी व लोहगाव या महसुल गांवाची हद्द
उत्तर पुर्व – लोहगाव, वाघोली या महसुल गावांची हद्द
पूर्व – मांजरी बु., शेवाळेवाडी, हडपसर या महसूली गावांची हद्द व फुरसुंगी महसुली गावातील कचरा डोपोची हद्द
दक्षिण पुर्व – महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसूली गावांची हद्द व उरूळी देवाची महसुली गावातील कचरा डेपोची हद्द
दक्षिण – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसूली गावांची हद्द
दक्षिण-पश्चिम – पश्चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी सणसनगर, कोपरे या महसूली गावांची हद्द
पश्चिम – कोंढवे धाडवे, बावधन बु. व खुर्द, म्हाळुंगे, सुस या महसुली गावांची हद्द
पश्चिम-उत्तर – बाणेर, बालेवाडी या महसूली गावांची हद्द व पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द
पहा व्हिडिओ…






