पुणे शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंग तपासणी करता पाच पथक नियुक्त; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय…

पुणे : पुणे महानगर पालिकेकडून पुणे शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंग तपासणी करता पाच पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.या पथकांमार्फत अनाधिकृत होर्डिंग ची तपासणी केली जाणार आहे.
यामध्ये यामध्ये जागेवर परवानगीचा बोर्ड न लावणे दिलेल्या आकारमानापेक्षा जास्त मापाचा बोर्ड लावणे नियमांचे उल्लंघन करणे त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग आढळून आल्यानंतर सदर होर्डिंग वर कारवाई करून ते निष्कर्षित करण्यात येणार असून निष्कषणानंतर त्या होर्डिंगची गुगल इमेज वरून ते होल्डिंग कोणत्या सालापासून अस्तित्वात आहे. त्याप्रमाणे त्यांचे कडून दंडासह परवाना शुल्क वसूल केले जाणार आहे.

त्याचबरोबर निष्कषणासाठी येणारा दोन लाख रुपये इतका खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे आज हडपसर भागामध्ये पदकामार्फत 30 होर्डिंगची तपासणी केली असून पथकास ७ अनधिकृत होर्डिंग आढळून आलेले आहेत त्यानुसार आज एकूण ४ होर्डिंग वर निष्कषणाची कारवाई करण्यात आलेली आहे.



