पुणे शहर
प्रजासत्ताक दिनी मोतीबाग कार्यालयात ध्वजारोहण

पुणे, ता. २७ – भारतीय संस्कृती संवर्धक संस्था -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांत कार्यालय असलेल्या मोतीबाग येथे ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बांधकाम व्यावसायिक लोटस कन्स्ट्रक्शनचे आदित्य महाराज सिंह यांचे हस्ते २६ जानेवारी रोजी सकाळी ठीक ७.४५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुणे आदित्य महाराज सिंह यांचे हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले.
त्यांनी आपल्या मनोगतात संघाच्या कामाबाबत कौतुक करीत उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेचे कार्यवाह प्रसाद खेडकर, कसबा भागाचे संघचालक ऍड. प्रशांत यादव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.






