७० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न महायुती सरकारने सोडवला याचा अभिमान-दीपक मानकर

मराठा आरक्षणाचा तिढा सुटला, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी जल्लोष
पुणे : मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने आज घेतला. मराठा संघर्षयोद्धा श्री. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच महिन्यांपासून सुरू केलेल्या लढ्याला खऱ्या अर्थाने आज यश मिळाले आहे. याचा आनंदोत्सव राज्यभरातील मराठा समाजाकडून केला जात असून आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नारायण पेठेतील पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या उपस्थितीत पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना दीपक मानकर म्हणाले “मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ७० वर्षांपूर्वीच पूर्ण व्हायला हवी होती. आज सर्वसाधारण कुटुंबातील एक माणूस पुढे येतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवत संपूर्ण समाज रस्त्यावर येतो, याच कारण देखील आपण समजून घेतलं पाहिजे. शैक्षणिक नोकरीच्यादृष्ट्या होणारा अन्याय हा मराठा समाजामध्ये दिसून येत होता. आजच्या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळणार आहे. आजवर मराठा समाजातील अनेक नेते राज्यकारभार पहात होते, परंतु कोणीही हा निर्णय होऊ शकला नव्हता. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तिघांनी एकत्र येऊन या निर्णयाला कायदेशीर पद्धतीने कसे बसवता येईल याचा विचार करून हा निर्णय घेतला याचा आनंद आहे”



दरम्यान, आनंदोत्सवावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीमध्ये महायुती सरकार मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, मराठा समाजाचे संघर्षयोद्धा श्री. मनोज जरांगे पाटील व सकल मराठा बांधव – भगिनी यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील शहर कार्यकारणीच्या वतीने करण्यात आला.



यावेळी विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे, सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, सांस्कृतिक अध्यक्ष विजय राम कदम, वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष विजय बाबर, पथारी अध्यक्ष प्रशांत कडू, सरचिटणीस योगेंद्र गायकवाड, अर्चना चंदनशिवे, शालिनी जगताप, डॉ.सुनीता मोरे, उपाध्यक्ष नुरजहा शेख, माधवी मोरे, शांतीलाल मिसाळ, राहुल म्हस्के, गोविंद पवार, चेतन मोरे, नारायण तेलंग, नरेंद्र पावटेकर, राहुल तांबे, संतोष बेंद्रे, वंदना साळवी, अशोक जाधव, लावण्या शिंदे, अच्युत लांडगे, अनिता पवार, गजानन लोंढे, सुरेश जौजाळ, श्वेता होनराव, रामदास गाडे, सत्यम पासलकर, प्रसाद चौगुले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले.


