पुणे शहर

पुण्यात मिनी बसला लागलेल्या आगीत  चार जणांचा होरपळून मृत्य..


पुणे : बसला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील हिंजवडी येथे घडली आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बसच्या समोरच्या भागाला अचानक आग लागली. त्यामुळे चालकाला बाहेर उडी मारावी लागली. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. बसमध्ये एकूण 15 जण होते.

होमा प्रिंटिंग प्रेसची ही टॅम्पो ट्रॅव्हलर बस असल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाच्या पायाला आगीच्या झळा लागल्यानंतर चालकानं पटकन गाडीतून खाली उडी मारली. त्यानंतर बसचा वेग कमी झाला आणि काही अंतर पुढे जाऊन ती सिमेंटच्या ब्लॉकला धडकली.

काही सेकंदांमध्ये बसची आग वेगानं वाढली. आग लागल्याचं कळताच काही लोकांनी बसच्या बाहेर उड्या घेतल्या. मात्र, पाठीमागे बसलेल्या चौघांना बाहेर पडता आलं नाही. तसंच आपत्कालीन दरवाजाही उघडू शकला नाही. चालकाची प्रकृतीही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. तर प्रवाशांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत

-सुभाष भोसले, वय 42
-शंकर शिंदे, वय 60
-गुरुदास लोकरे, वय 40
-राजू चव्हाण, वय 40, 
सर्व राहणार पुणे

जखमी झालेल्यांची नावे

-प्रदीप राऊत 
-प्रवीण निकम 
-चंद्रकांत मलजीत 
-संदीप शिंदे
-विश्वनाथ झोरी
-जनार्दन हंबारिडकर – टेम्पो चालक

Img 20250310 wa02324095435649637866308
Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये