पुणे शहर

नगर जवळील भीषण अपघातात कर्वेनगर मधील ४ जणांचा मृत्यू

पुणे : नगर पाथर्डी रस्त्यावर सँट्रो कार व बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये कर्वेनगर मधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. काल रात्री हा अपघात घडला. Road accident

कर्वेनगर मधील हॅपी कॉलनी गोसावी वस्ती येथील चार जण लग्नासाठी स्थळ पाहण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा पुण्याकडे येताना नगर पाथर्डी रस्त्यावर सेंट्रो कार व बस यांच्यात धडक होऊन अपघात घडला. अपघात भीषण असल्याने चार ही जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातात केशव विठ्ठल बोराडे ( वय २५), विनोद महादेव धावणे (वय २०), परमेश्वर काळे (वय ३५) बाळासाहेब कदम (वय ५५) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये