पुणे शहर

शिवसंग्राम संघटना व एमव्हीआर फाउंडेशनकडून पत्रकारांसाठी मोफत रुग्णवाहिका

पुणे :  कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटना पुणे शहर व  एम. व्ही. आर. फाउंडेशनच्या वतीने पुणे शहरातील पत्रकारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी खास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज ही रुग्णवाहिका पुणे श्रमिक पत्रकार संघाकडे सुपूर्द करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने कोरोना ची लागण झालेले टीव्ही ९ वृत्त वाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांच्या आदेशानुसार आज शिवसंग्राम संघटना व एम. व्ही. आर. फाउंडेशन वतीने पुणे शहरातील पत्रकार बंधू व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मोफत रुग्णवाहिका श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे प्रदान करण्यात आली.

रुग्णवाहिकेच्या डिझेल चा आणि ड्रायव्हर चा खर्च शिवसंग्राम संघटना करणार आहे.यावेळी पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, डॉ. विजय रमानन, शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, प्रदेश सचिव शेखर पवार, प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे, डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेशचे समिर निकम, सामाजिक न्याय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण ओहोळ, पुणे शहर महिला अध्यक्षा कालिंदी गोडांबे, सुजाता ढमाले, निशा गायकवाड, सचिन दरेकर, दिलीप पेटकर, पराग निकम,संजय लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये