पुणे शहर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मोफत बससेवा पुन्हा सुरू

पुणे : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कामकाज नियमित सुरू झाल्याने विद्यापीठात विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाने पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) सामाजिक उत्तरदायित्त्वाअंतर्गत विद्यापीठाला सीएनजीवर धावणाऱ्या दोन बस उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर २०१९मध्ये या बसेसद्वारे वाहतूक सुरू करण्यात आली. सुरुवातीला तीन महिने मोफत आणि त्यानंतर नाममात्र शुल्क आकारण्याची योजना होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने बससेवा थांबवावी लागली. आता विद्यापीठ परिसरात येणारे विद्यार्थी आणि येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढल्याने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पुन्हा एकदा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता एक बस दर अर्ध्या तासाने विद्यापीठ परिसरात फेऱ्या मारते. ही बस विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते विद्यापीठात असणाऱ्या सर्व मुख्य ठिकाणापर्यंत वाहतूक करते. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची सोय होण्यासोबतच विद्यापीठातील प्रदूषण कमी व्हावे, खासगी वाहनांची अनावश्यक वाहतूक कमी होण्यासाठी ही बससेवा सुरू करण्यात आली. आवश्यकतेनुसार आणखीही बस विद्यापीठात सुरू केल्या जातील, असे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी सांगितले.

Img 20220708 wa00011330202002021897215

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये