पुणे शहर

वारजेत महिलांसाठी मोफत झुंबा डान्स क्लास ; बीजेपी पुणे शहर व आकांक्षा नारी मंचचा उपक्रम

पुणे : pune city, warje वारजे येथे भारतीय जनता पार्टी पुणे शहर आणि आकांक्षा नारी मंच यांचे संयुक्त विद्यमाने आज मोफत झुंबा डान्स क्लासेसचे ऊदघाटन नगरसेविका, पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर , सिनेअभिनेत्री गौरी नाईक , पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले यांचे हस्ते करण्यात आले. Free Zumba dance class for womens in Warje;  Initiative of BJP Pune City and Akanksha Nari Manch

Img 20210715 wa0178

याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव,  आकांक्षा नारी मंचच्या अध्यक्षा मनीषा दांगट, समन्वयक अश्विनी पवार , कविता मोरे , बेबी दांगट , सुजाता दांगट , हेमांगिनी पाटणकर यांच्यासह अनेक महिला ऊपस्थित होत्या .

दि क्लान फिटनेस वर्कशॅाप च्या संचालिका शालिनी पिडीहा या दर गुरूवार आणि शनिवार रोजी दुपारी ४ ते ५ वेळेत झुंबा डान्स क्लासेस घेणार आहेत . आज पहिल्याच दिवशी ५५ महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला . नगरसेविका मंजुश्री खर्डेकर , सिनेअभिनेत्री गौरी नाईक , पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले .
या उपक्रमाचे आयोजन भाजपा सहकार आघाडी पुणे शहर अध्यक्ष  सचिन दशरथ दांगट यांनी केले आहे.

Img 20210707 wa0004

शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी झुंबा डान्स चा चांगला फायदा होतो. सध्या शहरात झुंबा डान्स क्लास मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या क्लासची फी जास्त असल्याने वारजे भागातील महिलांसाठी हा झुंबा डान्स क्लास मोफत सुरू करण्यात आल्याचे सचिन दांगट यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये