महाराष्ट्र

गणरायाचे आगमन साध्या पध्दतीने पण उत्साहातच

गणरायाचे आगमन साध्या पध्दतीने पण उत्साहातच
पुणे : गणपती बाप्पा मोरया चा जयघोषात पुणे शहर आणि उपनगरात आपल्या लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका न काढता श्रीगणेशाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. जगावर आलेले करोना चे संकट जाऊ दे असच मागणं संकट मोचक बाप्पाकडे सर्वांनी आजच्या दिवशी केले.

आज सकाळपासूनच श्रींच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु होती. मंडळाच्या व घरच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी बालचमुपासुन ते मोठ्यापर्यंत सर्वांचीच लगबग सुरु होती. मात्र या सर्वच धावपळीत करोणाचे सावट जाणवत होते.
पुण्यातील मानाच्या कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग , केसरीवाडा आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई,अखिल मंडइ आदी प्रमुख मंडळांनी अत्यंत साध्या पध्दतीने आपल्या लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
कोथरुड मधील संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ, कर्वे रस्त्यावरील जयदीप मंडळ,  कोथरुड गावातील समस्त गावकरी मंडळ, पौड रस्त्यावरील साई मित्र मंडळ, आझादनगर मित्र मंडळ, संगम मित्र मंडळ, नवभुमी मंडळ हि सर्वच मंडळी वाजत गाजत मिरवणूक काढतात. गणरायाची स्वागत करत असतात मात्र या वेळेस साध्या पद्धतीने विधीवत गणरायाची पूजा करत प्रतिष्ठापना करण्यात आली.

एरंडवण्यातील भैरवनाथ तरुण मंडळ, देशप्रेमी मित्र मंडळ,  राजबाग तरुण मंडळ, कर्वेनगर मधील विकास मित्र मंडळ, विठ्ठल रुक्मिणी मित्र मंडळ वारजेतील श्रीमंत राजयोग मित्र मंडळ यांनी विधीवत पुजा करत श्रींची प्रतिष्ठापना केली. महापालिकेच्या अहवालाला प्रतिसाद देत मंडळांनी मंडप घालने टाळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये