महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा तपास करण्याचा पोलिसांना आदेश

चंद्रकांत पाटलांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा तपास करण्याचा पोलिसांना आदेश
पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक शपथपत्रात मध्ये माहिती लपवल्याच्या दाव्यासंदर्भात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत याबाबतचा तपास करून कोथरूड पोलिसांनी १६ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करावा असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. याबाबत कोथरूड मधील रहिवासी असणारे डॉ. अभिषेक हरदास यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. पाटील यांनी निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात माहिती लपवून ठेवली असल्याचे हरदास यांनी दाव्यामध्ये आरोप केलाआहे.. पाटील यांनी शपथ पत्र मध्ये उत्पन्नाचे स्त्रोत त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झालेले आहे किंवा नाही ही माहिती लपवले असल्याचे दाव्यात म्हटले आहे. मात्र पाटील यांनी आरोपाचे खंडन करत आपण दिलेली सर्व माहिती सत्य असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये