पुणे शहर

Pune Metro : मेट्रोचे काही बॅरिकेड्स सणासुदीला हटवणार

पुणे : सणासुदीच्या काळात गणेश आणि दहीहंडी मंडळांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडे पुणे मेट्रोच्या कामांसाठी लावलेले काही बॅरिकेड्स हटवण्याची विनंती केली आहे. आता, महामेट्रोने पुणे महापालिका (PMC) आणि वाहतूक पोलिस विभागाशी सल्लामसलत करून बॅरिकेडिंग हटवण्याचे किंवा स्थलांतरित करण्याचे मान्य केले आहे.
मंडईजवळ असे बॅरिकेडिंग आधीच हटविण्यात आले आहेत. महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी देखील स्पष्ट केले आहे की, सर्व ठिकाणी असे बदल दिसणार नाहीत. आवश्यकतेनुसारच ते काढले जातील.

सणासुदीच्या काळात पायी चालणाऱ्यांची आणि काही प्रमाणात वाहनांची संख्या अधिक असते.
नागरिकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी सणासुदीच्या दिवसांमध्ये कामाच्या ठिकाणी अधिक मनुष्यबळ तैनात करण्याची योजना महामेट्रोने आखली आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे की, याबाबतची योजना तयार करण्यासाठी मेट्रोच्या कामांजवळील ठिकाणांचा आढावा घेण्यात येईल.

Fb img 1647413711531
Img 20220801 wa0304

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये