पुणे शहर
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिवपदी गणेश वरपे

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश
सचिवपदी गणेश वरपे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावेळी भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस सुशिल मेंगडे व शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर उपस्थित होते.
या निवडीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनीही वरपे यांचे अभिनंदन केले असून युवकांचे प्रश्न सोडवून जास्तीत जास्त तरुणांना भाजप मध्ये सहभागी करून घेण्यासाठी वरपे यांनी काम करावे यासाठी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असून पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वरपे यांनी निवडीनंतर सांगितले आहे.







