महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी १ डिसेंबर ला मतदान

मुंबई : विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.या मतदारसंघातील एकूण पाच जागांसाठी येत्या एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर सात डिसेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. त्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे.

औरंगाबाद पुणे व नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघातील तीन जागा तर अमरावती व पुणे विभागातील शिक्षक मतदार संघातील दोन जागांसाठी या निवडणुका घेण्यात येणार आहेत

या पाच जागांवर अनुक्रमे सतीश चव्हाण चंद्रकांत पाटील, अनिल सोले,श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत हे पाच आमदार कार्यरत होते त्यांचा कार्यकाळ 19 जुलै रोजी संपला आहे तर चंद्रकांत पाटील हे विधानसभेवर यापूर्वी निवडून आले होते. त्यामुळे त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झालेली आहे.

Img 20201024 wa0166 1

या जागांचा कार्यकाळ संपून चार महिने उलटले आहेत परंतु कोणाच्या संकटामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या आता मात्र डिसेंबर रोजी या निवडणुका होतील. अशी अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे.

Img 20201028 wa0145

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये