कोथरूडमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’तील सहभागी 4 हजार महिलांचा मेळावा; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने आयोजन
कोथरुड : कोथरुड विधानसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या अनुषंगाने अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित अभियानांतर्गत ज्या महिला भगिनींनी नावनोंदणी केली अशा असंख्य भगिनींचा काल कोथरुड मधील परमहंस नगर, जीत मैदान येथे महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कोथरुड मतदारसंघातील सुमारे 10 हजार महिलांची लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी करून घेतली होती. यापैकी काल 4 हजार महिलांचा काल मेळावा घेण्यात आला. यावेळी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक साडी देखील भेट म्हणून देण्यात आली. तसेच महिलांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या मातोश्री उपस्थित होत्या. दरम्यान परिसरातील समस्त महिला भगिनींनी या मेळाव्यास उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला, याबद्दल सर्वांचे आभार मानून महिलांशी संवाद साधला. तसेच सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमचे बंधू आणि मित्रपरिवाराची मोलाची साथ लाभली, याबद्दल त्यांचे ही आभार व्यक्त केले.