पुणे शहर

तरुणीच्या मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; तरुणीला अटक

पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तरुणीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत हरीश प्रेम किशन पवार (वय 24 रा. लष्कर, कॅम्प, पुणे) या तरुणाने पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली.

तरुणीने या विवाहित तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याच्या पत्नीला फोन करून त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केला. मानसिक छळ करत तरुणीने आता तू मर मला तुझे मेलेले तोंड बघायचे आहे, असे म्हणत दडपण आणले. त्यानंतर तरुणाने कल्याणीनगर येथील आगाखान पुलावरून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला होता. येरवडा पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात ही सर्व बाब उघडकीस आली. तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तरुणी विरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली. येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी ही माहिती दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर करीत आहेत.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये