कोथरुड

सुवर्णा खिलारे, स्वीटी गुप्ता, तेजल गवारे ठरल्या पैठणीच्या मानकरी.

गणेशनगरमधील राजबाग तरूण मंडळ व देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने आयोजन

कोथरुड : एरंडवणा येथील गणेशनगरमधील राजबाग तरूण मंडळ व देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने मंदार बलकवडे यांनी महिलांसाठी महाभोंडल्याचे आयोजन केले होते. यावेळी भोंडल्यासोबतच खिरापत ओळखा संगीतखुर्ची व उखाणा स्पर्धांही या ठिकाणी पार पडल्या.

एकुण ३५० महिलांनी यामध्ये सहभाग घेतला प्रत्येक स्पर्धेत ५ क्रमांक देण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी ईस्त्री, तृतिय क्रमांकासाठी संपुर्ण पुजेचे ताट, चतुर्थ क्रमांकासाठी बाऊल सेट, पाचव्या क्रमांकासाठी फ्रूट चॅापर, व सहभागी प्रत्येक महिलेस फोरपिस डब्बे देण्यात आले.

स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ भारती बलकवडे, कामिनी आटक, सीमा कणसे, शुभदा देखणे,प्रमिला फाले व पुजा मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेचे आयोजन मंदार बलकवडे,मंगेश मते,मंदार महाडिक,समीर बलकवडे, सतीश दिघे, रूपेश आटक व दिपक विश्वकर्मा यांनी केले.

Fb img 1647413711531

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:


खिरापत ओळखाः १)स्वीटी गुप्ता
२)सुनंदा पड्याळ ३)सीमा गरूडकर
४)वनीता फाले ५)राधा कणावजे

संगीत खुर्चीः
१)तेजल गवारे २)रुपाली बलकवडे ३)वैशाली मराठे
४)सुवर्णा भरम ५)सारीका भरम

उखाणे स्पर्धाः
१)सुवर्णा खिलारे, २)द्वितीय क्रमांक विभागुण देण्यात आला चंदा फाले / नंदा शेलार ३)पुजा फाले ४)साक्षी गावडे ५)प्रिया केसवड

Img 20220924 182515 453
कर्वेनगरमधील सायकलींचे संग्रहालय

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये