पुणे शहर

कोथरूडमधील गदिमा स्मारकासाठी शासनाकडून निधी मिळणार!

स्मारकाचा प्रस्ताव सादर करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे : नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या गदिमांचे देखणे स्मारक व्हावे; ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आयुक्तांना दिले.

यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, युवराज देशमुख, गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, भाजपा प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोथरूड मधील महात्मा सोसायटीजवळ गदिमांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या कामाला गती मिळावी  यासाठी  पाटील यांनी जानेवारी २०२३ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला होता. तसेच सदर काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या होत्या.

Img 20240404 wa0016281291197243699799508498

त्यानुसार स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे स्मारकाच्या पुढील टप्प्याचेही काम मार्गी लागावे  यासाठी  चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा स्मारकाच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे जगभरातील १५ कोटी मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्यांचा सन्मान करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आधुनिक वाल्मिकी महाकवी गदिमांच्या स्मारकाचे काम पूर्ण होऊन देखणे स्मारक व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे महापालिकेने स्मारकाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास स्मारकाचे सौंदर्य वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी यानिमित्ताने दिली.

Img 20240404 wa0013281291032765212350995267
Img 20240404 wa0012281298841886320058264868

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये