रविवारी पुण्यात भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन : ‘अखंड सूर्यनमस्कार महायज्ञ’ अभियानाअंतर्गत होणार स्पर्धा

लोकमान्य फेस्टिवल आणि मनो-वर्धन योग संस्थेचे आयोजन
पुणे : पुणे लोकमान्य फेस्टिवल आणि मनो-वर्धन योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘अखंड सूर्यनमस्कार महायज्ञ’ या अभियानाअंतर्गत ही स्पर्धा होणार आहे. यंदा अभियानाचे हे 27 वे वर्ष आहे.
‘रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिना’निमित्त संस्थेच्या 1478 साधकांनी ‘108 दिवसात 27 लाख सूर्यनमस्काराचा संकल्प’ पूर्ण केला. या अभियानाच्या सांगता सोहळ्यानिमित्त ‘रविवार 9 फेब्रुवारी 2025’ रोजी भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लोकमान्यनगर उद्यान सदाशिव पेठ, पुणे’ येथे सकाळी 6 ते 9.30 या वेळात ही स्पर्धा होणार आहे. महिला व पुरुष मिळून एकूण 12 गटात ही स्पर्धा होईल. प्रत्येक गटातल्या प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्हाने गौरविण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त ‘सर्वोत्कृष्ट संस्थात्मक सहभागा’साठी प्रथम तीन संस्थांना सन्मानचिन्ह देण्यात येईल. तसेच सूर्यनमस्काराचा प्रचार व प्रसार करणाऱ्या योगतज्ञाना याप्रसंगी ‘सूर्यदूत’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
घराघरात सूर्यनमस्कार, मनामनात सूर्यनमस्कार, संपूर्ण. आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हे ध्येय मनात बाळगून सूर्यनमस्काराच्या प्रचार प्रसारासाठी 27 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या अभियानात दरवर्षी खूप मोठ्या संख्येने साधक सहभागी होतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 981495483 या मोबाईल नंबरवर व्हाट्सअप मेसेजवर नाव आणि वय कळवावे. असे आवाहन आयोजक पुणे लोकमान्य फेस्टिवल संस्थापक-अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते व मनो-वर्धन योगसंस्था संस्थापक मनोज पटवर्धन यांनी केले आहे.


