पर्यावरणाचा समतोल व शुद्ध ऑक्सीजनसाठी वृक्षारोपण गरजेचे : हर्षवर्धन मानकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कोथरुड मध्ये वृक्षारोपण..
कोथरुड : कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांना ऑक्सिजनचे महत्व काय आहे आणि शरीरात ऑक्सीजनची कमतरता झाल्यास माणसांचे कसे हाल होतात हे आपण सर्वांनी जवळून पाहिले आहे. त्यामुळे आता आपल्याला ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा प्रकारच्या मोहिमा मोठ्याप्रमाणावर हाती घेऊन वृक्ष संवर्धन करावे लागणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन मानकर यांनी व्यक्त केले. Tree planting in Kothrud on the occasion of 22nd anniversary of NCP.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त
कोथरुड परिसरातील ए.आर.ए. आय टेकडीवर हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी टेकडीवर जवळपास ५० देशी झाडांचे रोपण करण्यात आले. या रोपट्यांची वर्षभरासाठी संगोपणाची-देखभालीची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
मानकर पुढे म्हणाले,प्रत्येक व्यक्तिने किमान त्याच्या आयुष्यात एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे. जर असा संकल्प आपण केला तर पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत मिळेल.

यावेळी भूषण शिर्के, निलेश शिंदे, संतोष ढोक, जावेद शेख, मिलिंद वाघमारे, विजय बाबर, गणेश तोंडे, आशिष शिंदे, लखन सौदागर. रोहिदास जोरी, दिलीप कानडे, महिला पदाधिकारी ज्योती सूर्यवंशी, जयश्री पालवे, दीपा मोहिते, रोहिणी कामठे, धनश्री कराळे, सारिका चोरघडे, विद्यार्थी संघटनेचे शुभम माताळे, श्रीकांत बालघरे, ऋषिकेश कडू आदी उपस्थित होते.



























