वारजेत सचिन दांगट मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन…हिंदु मुस्लीम एैक्याचा दिला संदेश

वारजे : वारजे परिसरातील हिंदु मुस्लीम एैक्य अबाधित राहावे आणि हा संदेश पुढील पिढीत जाऊन त्याचा अंगीकार व्हावा या प्रामाणिक हेतुने सचिन दशरथ दांगट मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या इफ्तार पार्टीस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर , माजी उपमहापौर दिलीप.बराटे , वारजेगावचे सरपंच श्रीकृष्ण बराटे , माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ , माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील , माजी नगरसेवक किरण बारटक्के , स्वीकृत नगरसेवक संजय भोर , पैगंबर शेख आलम पठाण , हमीद शेख , अनवर शेख , रफिक शेख , अमजद अन्सारी , सुभाष अग्रवाल , अनिल भंडारी , ऋषिकेश रजावत , व्यंकटेश दांगट उपस्थित होते.

देशात हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत रमजानच्या पवित्र महिन्यातील इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. मानवतेच्या भावनेतून सर्व धर्मीयांनी एकमेकांचे सण साजरे केल्याने समाजातील एकोपा वाढण्यास मदत होते असे मत आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केले.
वारजे परिसरातील हिंदु मुस्लीम एैक्य अबाधित रहावे या प्रामाणिक हेतुने या इफ्तार पार्टीचे नियोजन दरवर्षी केले जात असल्याचे संयोजक सचिन दशरथ दांगट यांनी यावेळी सांगितले.



जगातला कुठलाच धर्म वाईट वागण्यास , वाईट कृत्य करण्यास सांगत नाही. आपण सगळ्यांनी या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे हे सांगत असताना वारजे परिसरातील अनेक स्थानिक प्रश्नांवर दिलीप बराटे यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. बाबा धुमाळ यांनी समस्त वारजेकर हे सर्वधर्मसमभावाने एकत्र येऊन एकमेकांचे सण साजरे करण्यात धन्यता मानणारे असल्याचे सांगितले .पैंगबर शेख यांनी मुस्लीम समाजास येणाऱ्या काही अडचणींबाबत प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दांगट मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.






