महाराष्ट्र

पंढरपुरात विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनास आजपासून सुरूवात

पंढरपूर : लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आजपासून (2 एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे. याशिवाय श्री विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्य पूजा देखील सुरू होत आहे. त्यामुळे करोनामुळं मागील काही काळापासून बंद असलेलं विठुरायाचं थेट दर्शनही आता भाविकांना घेता येणार आहे. गुढीपाडव्या निमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिलेली आहे.

करोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 17 मार्च 2020 रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळी पाडव्याला मंदिर पुन्हा सुरू झाले. तर, दुसऱ्या लाटेत 12 एप्रिल रोजी मंदिर पुन्हा बंद करावे लागले. त्यानंतर नुकतेच कार्तिकी एकादशीला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले होते. मात्र करोना संसर्गामुळे सरकारने अनेक नियम लागू केले होते. श्री विठ्ठलाचे केवळ मुखदर्शनच सुरू होते, पदस्पर्श दर्शन बंदच होते. श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन सुरू करा अशी मागणी भाविकांकडून केली जात होती. आता करोनाची तिसरी लाट ओसरली असून, सरकारने निर्बंध देखील हटवले आहेत. त्यामुळे आजपासून श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

Img 20220401 wa00069118907792321060635
Img 20220401 wa00053953723036919566856
Img 20220402 092823 3147898442393631907355
Img 20220402 092838 8354604438478681415961
Img 20220331 194558 4714635920303569774190
Img 20220331 194555 74885937282696690566
Img 20220331 194602 2992942339412416554028
Img 20220401 wa0207
Fb img 1648877169192
Img 20220401 wa000868835748216030951
Img 20220401 191838 5877490473980342702457
Img 20220401 191537 647 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये