पुणे शहर
पुण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी आता व्हॉट्सअप नंबर

पुणे : महिलांना गरजेच्या वेळी तातडीने मदत मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी ८९७५९ ५३१०० हा व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. याशिवाय तातडीच्या मदतीसाठी 112 क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता, असे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.
या सेवेसाठी महिला, विद्यार्थिनी या क्रमांकावर संदेश पाठवू शकतात. पुणे शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पुणे पोलीस आयुक्तांनी हा आणखी एक विधायक उपक्रम यानिमित्ताने सुरू केला आहे.













