कसब्यासाठी हेमंत रासने तर चिंचवडसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपची उमेदवारी जाहीर

पुणे : कसबा पोट निवडणूकीसाठी भाजपाच्या वतीने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून चिंचवड विधानसभेसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता चिंचवड मध्ये विरोधी पक्ष काय भुमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. काल भाजप च्या बैठकीत उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार आज दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
हेमंत रासने यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. आता महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत असल्याने रासने आणि धंगेकर यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पिंपरी मतदार संघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप व लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची असा पेच भाजप समोर होता. आज अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला







