पुणे शहर

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भाजयुमो कडून पुणे जिल्ह्यातील ३० युवकांचा सन्मान

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

पुणे :  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्ह्यातील उल्लेखनीय समाज उपयोगी काम करणाऱ्या ३० युवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालेत राजेश मनगिरे व शामराव धुमाळ यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. Honoring 30 youths from Pune district on the occasion of Rajmata Jijau and Swami Vivekananda Jayanti

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी  प्रभारी युवा मोर्चा अनुप मोरे, भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस श्रीकांतजी ताम्हाणे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप सातव, जीवन साखरे, विद्यार्थी आघाडी भा.ज.पा. पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल शिवले आदी उपस्थित होते.

Img 20201213 wa0074

युवक हे देशाचे भवितव्य आहेत. देशाच्या प्रगतीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे, तसेच  त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक होणे गरजेचे असल्याने  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने राजमाता  जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Img 20210115 wa0107
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये