पुणे शहर

वैकुंठ स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा सत्कार..

पुणे : मातृभूमी सोशल फाउंडेशन व जनता दल सेक्युलर, पुणे शहर यांच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमी येथील कर्मचाऱ्यांचा सत्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस व जनतादल सेक्युलर, पुणे शहर अध्यक्ष माननीय विठ्ठल सातव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक अर्चना कदम,  कार्यक्रमाचे संयोजन मातृभूमी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक लांबे, जनता दल सेक्युलर पुणे शहर सरचिटणीस दत्ता पाकिरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष वसंतराव कोळी,  बाजीराव मासाळ, श्रीपाद फेंगसे, जनता दल सेक्युलरचे जीवन श्रीसुंदर आदी उपस्थित होते.

यावेळी स्मशानभूमीत काम करणाऱ्या ७० कामगार बंधु- भगिनींचा  शाल, मानपत्र, स्वामी विवेकानंदांचे पुस्तक, गुलाब पुष्प व मिठाईचा पुडा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीपाल सबनीस म्हणाले येथे दररोज येणाऱ्या मृतदेहाची काळजी घेऊन त्यांचे सन्मानाने अंत्यसंस्कार करून त्यांचे मरण आपण सुंदर करीत आहात मी आपणास सलाम करतो. सत्कार हे निमित्त आहे, आपण करीत असलेल्या कामाला तोड नाही. कोविडच्या काळात आपण सगळीकडे भयावह परिस्थिती असतानाही आपण आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही त्यामुळे  आपल्यातील माणुसकीला पुन्हा एकदा सलाम.

या वेळी जनता दल सेक्युलर पुणे शहर अध्यक्ष यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विनायक लांबे यांनी केले.सुत्रसंचालन दत्ता पाकिरे यांनी केले.  वसंतराव कोळी यांनी आभार मानले.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये