पुणे शहर

वारजेत महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान..

सचिन दांगट यांच्या वतीने आयोजन..

वारजे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन वारजे माळवाडी परिसरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १०० महिलांचा सन्मान भाजप सहकार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सचिन दांगट व मनिषा दांगट यांच्या वतीने करण्यात आला 

वारजे माळवाडी परिसरात स्वच्छतेची जबाबदारी उचलणाऱ्या महिला सफाई कर्मचारी , महिला वाहतुक कर्मचारी , महिला पोलीस कर्मचारी , महावितरण महिला कर्मचारी , जेष्ठ महिला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करून कुटुंबास हातभार लावणा-या महिला , मजुर अड्डयावरील महिला , स्वस्त धान्य दुकाने चालवून हजारो महिला भगिनींची सेवा करणाऱ्या बचतगटप्रमुख महिला अशा  एकुण १०० महिला भगिनींचा सन्मानपत्र , गुलाबपुष्प देऊन यशोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी भाजप सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट, मनिषा सचिन दांगट , वंदना नवघरे , ऋषिकेश रजावात , व्यंकटेश दांगट , किरण साबळे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सचिन दांगट म्हणाले, दरवर्षी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. घरात काम करणारी गृहिणी ही कौटुंबीक जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत असते. प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात देत असलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे या सर्व महिला भगिनींचा आज महिलादिनी सन्मान करण्यात आला.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये