महाराष्ट्र

लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे मी – उद्धव ठाकरे

मुंबई : भाजप सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यात उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेल्या उत्तर सध्या चर्चेत आलंय.
केंद्र सरकारविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हात मिळवणी केली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आजची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मंत्रीमंडळाची बैठक होती. त्यामुळे सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना उद्धव यांना बोलू देण्यास सांगितले. उद्धव ठाकरे त्यावर ममता दीदींना म्हणाले, इजाजत है क्या दीदी..

ममता म्हणाल्या,  उद्धव जी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है.त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले,लढने वाले बाप का लढने वाला बेटा हूं ! साथ मे है और साथ मे रहेंगे.
मुख्यमंत्री ठाकरे
संकट आलं की आपण एकत्रित येतो. पण आपल्याला एकत्रित यायला संकटाची गरज कशाला आहे? आपण एरवीसुद्धा भेटत राहिले पाहिजे ज्यामुळे संकटच घाबरून म्हणेल की हे लोक एकत्र आहेत. साथ मे है और साथ मे रहेंगे. एक बार तय करो डरना है, या लढना है, असेही ठाकरे म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये