पुणे शहर

वारजेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

संयुक्त जयंतीनिमित्त प्रा.नितीन बानुगडे यांचे व्याख्यानाचे आयोजन

वारजे : शिवभिम सामाजिक संघटना, निदान फाऊंडेशन, मानवता सामाजिक सेवा संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिव-शाहु-फुले-आंबेडकर विचारांचे सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून इतिहासातील दाखले देत प्रभावीपणे मांडले. तसेच या देशाला शिवछत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची खरी गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांचे व्याख्यान तरुणांमध्ये प्रेरणा अन् नवचैतन्याची स्फूर्तीदायी ठरले.

या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत कांबळे, अमित वांजळे, दिपक बलाढे, किशोर पवार, राहुल रिकीबे यांनी केले होते. यावेळी माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, सचीन दोडके, सायली वांजळे-शिंदे, युवक काँग्रेसचे सचीन बराटे, अतुल दांगट, माजी सरपंच सुभाष नाणेकर, विकास दांगट, पीडीसी बॅंकेचे संचालक प्रविण शिंदे, स्विकृत सभासद सचिन विष्णु दांगट, सरपंच नितीन धावडे, भगवान गायकवाड, आरपीआयच्या संगीता आठवले, दिलीप कदम, शिवसैनिक संतोष शेलार, किशोर कांबळे, प्रशांत लांडगे, सुभाष कदम,

अभिजीत धावडे, राजकुमार शिंदे, संतोष कदम, विनायक लांबे, दत्ता पाकीरे, निलम डोळसकर, शांता नेवसे, हालीमा शेख, अभिमन्यू तिखे, अभिजीत पायगुडे, गणेश राऊत,
प्रवीण सोनवणे कुणाल सरवदे, साईनाथ जोशी, राहुल पायगुडे, अजय वांजळे, पैगंबर शेख, नानासाहेब ओव्हाळ, अरविंद शिंदे, सागर कदम, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पंडीत यांनी केले. प्रस्ताविक चंद कांबळे यांनी केले तसेच आभार दिपक बलाढे यांनी मानले.

पुण्यातील तापमानाने गाठला उच्चांक
Img 20220425 wa00102978251768482543832
Img 20220428 wa0008 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये