कोथरुड

कोथरुडमध्ये रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचा पालिका कर्मचाऱ्यांनी केला पोलिसांसारखा तपास ; शोधून काढला पत्ता व केली कारवाई..

कोथरुड : रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी कोथरुड  बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अनेक वेळा जनजागृती करण्यात आली असली तरी काही बेजबाबदार नागरिकांकडून रस्त्याच्या कडेने वारंवार कचरा टाकण्यात येत आहे. परंतु आता यावर क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी नवी शक्कल काढत पोलिसांसारखा तपास केला व कचर्‍यातूनच कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा पत्ता शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. If garbage is dumped on the road in Kothrud, now the authorities can reach the house at any time and take punitive action.

कोथरूडमध्ये डहाणूकर कॉलनी परिसरात व कमिन्स कंपनीच्या पाठीमागील रस्त्यावर काही नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत होता. रस्त्यावर सातत्याने पडत असलेल्या कचऱ्यामुळे सकाळी फिरायला जाणारे नागरिक देखील त्रस्त झाले होते. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यात हात घालून संबधित नागरिकांचा पत्ता शोधून त्या भागातील मुकादम वैजिनाथ गायकवाड, आण्णा ढावरे व आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार यांनी गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये पंधरा नागरिकांवर त्यांच्या घरी जावून कारवाई करत ५७५० रुपये शुल्क वसूल केले.

या रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना शोधून काढण्यासाठी त्यांनी टाकलेल्या कचऱ्यायातूनच त्यांचा पत्ता शोधण्यात आला व त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.  रस्त्यावर कचरा टाकल्यानंतर अधिकारी घरापर्यंत पोहोचू शकतात याचा विचारही न केलेल्या नागरिकांना या कारवाईमुळे  चांगलाच दणका बसला आहे.

Img 20210707 wa0004

रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यात सापडलेल्या विविध बिलांच्या व इतर फाडलेल्या कागदांवरून कचरा टाकणाऱ्या व्यक्तींचा पत्ता शोधून त्याच्या घरी जाऊन कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दंड वसूल केला. या भागात रस्त्याच्या कडेने कचरा टाकू नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. 

रस्त्याच्या कडेने ज्या ठिकाणी कचरा पडतो त्या ठिकाणी रांगोळ्या काढून ही जनजागृती करण्यात येत असून. त्याचा आता फरक पाहायला मिळत आहे. रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीला यश मिळत आहे.

सदर कारवाई सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार यांच्या निरीक्षणाखाली मुकादम वैजनाथ गायकवाड अण्णा ढावरे व आरोग्यरक्षक राजू सकट, परेश कुचेकर, राहुल लोखंडे, सुरेश कंधारे

Img 20210721 wa0013

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये