महाराष्ट्रपुणे शहर

मंदिरे उघडली नाही तर मंदिर सत्याग्रह करावा लागेल -खासदार गिरीश बापट


पुणे : भारतीय जनता पार्टी च्या वतीने महाराष्ट्रातील मंदिरे खुली व्हावी.या करता संपूर्ण राज्य भर अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा एक भाग म्हणून कसबा मतदारसंघात २४ ठिकाणी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

ओंकारेश्वर मंदिर येथे खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी बापट यांनी राज्य सरकार हेतुपुरस्सर मंदिरे मशिदी चर्च बंद ठेऊन लोकभावना दुखावत आहेत. कोरोना च्या पार्श्वभूमी वर लॉकडाऊन मध्ये राज्य सरकारला नागरिकांनी संपूर्ण सहकार्य केले. पण आता दारूची दुकाने व्यापारी बाजारपेठ हॉटेल इत्यादी चालू होत असताना मंदिर मशिदी बंद ठेऊन सरकार अन्याय करत आहे.

त्यामुळे जर मंदिरे उघडली नाहीत तर मंदिर सत्याग्रह करणार असल्याचा इशारा बापट यांनी दिला या आंदोलनाला आमदार मुक्ता टिळक,पुणे शहर सरचिटणीस नगरसेवक राजेश येनपुरे ,कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सुनील माने,पुष्कर तुळजापूरकर यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये