कोथरुड

मंदिरे सुरू करण्यासाठी वारजेत भाजपचे आंदोलन

वारजे माळवाडी :  मंदिरे आणि प्रार्थना स्थळे सुरू करण्यासाठी  अतुलनगर हायवे सर्व्हीस रस्ता चौकाजवळील दत्तमंदिर येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात नागरीकांनी  उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी नाना काटे पाटील, शिल्पा महाजनी, बंडोपंत चिंतावर, रामभाऊ मारणे, माधव देशपांडे, शशिकांत धारवाडकर, सचिन वांजळे ,श्रीपाद जोशी, विश्वनाथ तारु, मुरलीधर भोसले, मंदार रेडे उपस्थित होते. या घंटानाद आंदोलनांचे आयोजन माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी केले होते.अशोक उनकुले यांनी उपस्थित नागरीकांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये