कोथरुड

कोरोनामुळे कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर कुटुंबांसमोर सरकारी कामाच्या अडचणी ; कोथरूड भाजयुमोचा मदतीचा हात..

पुणे : pune city, Kothrud कोरोना आपत्तीत कर्त्या व्यक्तीच्या अचानक निधनामुळे अनेक कुटूंबाचे जनजीवन विस्कळित झाले असून त्यांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. अशा कुटुंबांना आधार देऊन त्यांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी एक अनोखे सेवा कार्य भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड विधानसभा मतदारसंघाने वकील अघाडीच्या सहयोगाने हाती घेतले आहे. Difficulties in government work for families after the death of the head of the family due to corona;  Kothrud Bhajyumo’s helping hand ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे.  कोरोना आपत्तीत घरातील कर्त्या पुरुषाचे  निधन झाल्याने अनेक कुटुंबांना काही तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्थावर मालमत्ता व मिळकतीवर  वारसा नोंद करणे, ही एक मोठी समस्या आहे. यामुळे येत असलेल्या कायदेशीर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अशा कुटुंबांना निशुल्क (मोफत) सल्ला व सेवा या उपक्रमाअंतर्गत देण्यात येत आहे.

वारसा हक्काचे प्रतिज्ञापत्र, 7/12 वारस नोंद , फेरफार हक्क सोड पत्र (Release Deed) , दिवाणी न्यायालयातून वारसा प्रमाणपत्र (Heirship Certificate) उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate) ग्राहक  मंच तक्रार -Consumer Court  (विमा, बँकिंग, इत्यादी), लोक न्यायालय प्रलंबित प्रकरणे, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे (MahaRera) तक्रार, सरकारी मुद्रांक शुल्क, (सरकारी कोर्ट फी असेल तेवढी आकारली जाईल)अशा महत्वपूर्ण गोष्टींसाठी सल्ला व सेवा पुरवली जात आहे.

या संदर्भात दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले की, घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोना मुळे अचानक निधन झाले असल्याने अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण या दुःखातून सावरत असताना तांत्रिक अडचणींचा सामना या कुटुंबांना करावा लागत आहे. सरकारी कामे कशी करायची याची काहीच माहिती नसल्याने आता कसे करायचे असा प्रश्न या कुटुंबांसमोर आहे. हा त्यांचा प्रश्न सोडवून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वरील उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

अ‍ॅड. सौमित्र देशमुख ( संयोजक: भाजप वकील आघाडी, कोथरूड विधानसभा) मो. नं. 9595181766
अ‍ॅड. रणजित पाटील मो.नं. 97657 37396
अ‍ॅड. गौरव नाशिककर मो. नं. 98608 33994
अ‍ॅड. शिवराज जोशी मो. नं. 94055 43778
अ‍ॅड. निलेश निरगुडकर मो. नं. 80875 97017
गरजवंतांनी वरील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये