चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने फिरता जनसेवा आत्मनिर्भर रथ सुरू ; नागरीकांना होणार हा फायदा..

कोथरुड : भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांपर्यंत सर्व शासकीय योजना पोहचवण्यासाठी तसेच नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक किरण दगडे पाटील व सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या फिरत्या जनसेवा आत्मनिर्भर रथाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. On the occasion of Chandrakant Patil’s birthday, a public service aatmanirbhat chariot was started on behalf of corporator Kiran Dagde Patil; This will benefit the citizens.
याप्रसंगी भा.ज.पा. पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, भा.ज.पा. संघटन सरचिटणीस पुणे शहर राजेश पांडे, भाजपा प्रवक्ते संदिप खर्डेकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, दीपक पोटे, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे पाठक, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप सातव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरिकांच्या अडचणी जागेवर जाऊन सोडवण्यासाठी व शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा फिरता जनसेवा आत्मनिर्भर रथ तयार करण्यात आला आहे. भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील कायम नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यवर भर द्या असे आम्हाला सांगत असतात. त्यांच्या या मार्गदर्शनानुसार आतापर्यंत आम्ही काम केले आहे. आता या फिरत्या जनसेवा आत्मनिर्भर रथाच्या माध्यमातून आणखी प्रभावी काम केले जाईल, असे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी सांगितले.






