राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण..
स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्व योद्धांनी दिलेल्या योगदानाची सर्वांनी जाणीव ठेवणे गरजेचे : दीपक मानकर
पुणे : “९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्लयायात अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शंतनु कुकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर हे अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी बोलताना दीपक मानकर म्हणाले, ९ ऑगस्ट क्रांती दिनामुळे आपण १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन पाहू शकलो. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्व योद्धांनी दिलेल्या योगदानाची आपण जाणीव ठेवणे गरजेचे आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली, त्याला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासन युवक,युवती, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. ह्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मार्टीची स्थापना करण्याचे घोषित केले आहे. त्यानिमित्त अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे भरवत या निर्णयाचे स्वागत केले. तसेच सेलच्या पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.
या वेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शंतनू कुकडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख,सेवादल अध्यक्ष शशिकला कुंभार, प्रदेश युवक अध्यक्ष महेश हांडे, महिला अध्यक्ष प्रिया गदादे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, ओबीसी अध्यक्ष हरेश लडकत,फार्मसी अध्यक्ष विनोद काळोखे, शंकर शिंदे,उपाध्यक्ष मुनीर सय्यद, मोहसीन शेख, पर्वती अध्यक्ष संतोष नांगरे, हडपसर अध्यक्ष शंतनू जगदाळे, योगेश वराडे,विजय डाकले, वडगावशेरी अध्यक्ष सतीश म्हस्के,महिला कार्याध्यक्ष गौरी जाधव
जैन अध्यक्ष जया बोरा, नीता गायकवाड,वासंती काकडे, सरचिटणीस धनंजय पायगुडे, महिला कार्याध्यक्ष संगीता बराटे, मंथन जागडे, विधानसभा कार्याध्यक्ष राहुल तांबे, रामदास गाडे, गोरखनाथ भिकुले, बाळासाहेब आहेर,संजय पाटील,राहुल गुंड, मुस्ताक शेख, गिरीश मानकर,राजेंद्र घोलप, प्रशांत निम्हण, भिकुले, नूतन शिवरकर, पंडित जगताप, राजेंद्र शितोळे,महेंद्र लालबेगी,निर्जला गायकवाड, विजय जाधव, सुनिता चव्हाण, विक्रम मोरे, अतुल जाधव, माधवी मोरे, कांता खिलारे, भारत पंजाबी, स्मिता कड, शिवानी पोतदार, युवराज तेले, संगीता घुले, आशा बोडके, शीला भालेराव, मारुती अवरगंड, सुनिता बडेकर, करुणा गायकवाड, नूरजहाँ शेख, दिपाली गायकवाड, रुपेश आखाडे, लावण्या शिंदे, श्वेता मिस्त्री, शाम शेळके, राधिका वाईकर, सनी किरवे, अनिकेत मोकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.