नगरसेवक किरण दगडे पाटील मित्र परिवार आयोजित दहीहंडी उत्सवाची उत्सुकता शिगेला ; आज सेलिब्रिटींच्या उपस्थित दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार..

पुणे ; दरवर्षी तरुण-तरुणी आणि नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या बावधन मधील नगरसेवक किरण दगडे पाटील मित्र परिवार आयोजित दहीहंडी उत्सवाची उत्सुकता सर्वांना लागली आसून आज सेलिब्रिटींच्या उपस्थित दहीहंडीचा थरार गोपाळ भक्तांना अनुभवायला मिळणार आहे.
बावधन बुद्रुक मधील तलाठी कार्यालया समोरील मैदानावर आज सायंकाळी होणाऱ्या या नगरसेवक किरण दगडे पाटील मित्र परिवार दहीहंडी उत्सवाची तयारी उत्तम नियोजनासह पूर्ण झाली आहे. दरवर्षी या दहीहंडी उत्सवाला हजारो नागरिकांची उपस्थिती असते आणि उत्तम आयोजनमुळे या संख्येत दरवर्षी वाढ होत चालली आहे.
आज होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच द केरला स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मा, दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे, अभिनेता देवदत्त नागे, घर बंदूक बिर्याणी फेम सायली पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजक नगरसेवक किरण दगडे पाटील, उद्योजक बापू दगडे पाटील व गणेश दगडे पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत कृती सेनन, आलिया भट, राधिका आपटे, तमन्ना भाटिया, सोहेल खान, जॅकलीन फर्नांडिस, डेझी शहा, रिचा चड्डा, विवेक ओबेरॉय, नेहा शर्मा, सुरभी हांडे, तेजश्री प्रधान, प्राजक्ता माळी, अक्षरा देवधर, हार्दिक जोशी अशा अनेक हिंदी, मराठी सेलिब्रिटींनी या दहीहंडीला उपस्थिती लावलेली आहे.
पुणे शहरातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवापैकी एक असणारा दहीहंडी उत्सव म्हणून नगरसेवक किरण दगडे पाटील मित्र परिवार आयोजित दहीहंडी उत्सवाकडे पाहिले जाते. आजचा दहीहंडी उत्सव ही शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला पोहचवणारा असणार आहे. येथील गोविंदांचा थरावर लागणारे थर आणि उपस्थितांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो. आणि हा अभूतपूर्व अनुभव पाहण्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन किरण दगडे पाटील मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.









