तुम्ही चांगले रील बनवता का ? आज तुमच्यासाठी बक्षीस कमावण्याची सुवर्णसंधी ; दहीहंडीचा रील बनवा आणि रोख पारितोषिक मिळावा

कोथरूड : तुम्ही रील बनवता का? तुम्हाला चांगले रील बनवता येतात का ? तर तुमच्यासाठी बक्षीस कमावण्याची आज संधी चालून आली आहे. कोथरूड मधील शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित अखिल आझादनगर दहीहंडी उत्सव २०२३ च्या वतीने दहीहंडी रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कोथरूड मधील शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित अखिल आझादनगर दहीहंडी उत्सव यांची दहीहंडी फोडतानाचा सुंदर रील मोबाईलमध्ये बनवणाऱ्यास आकर्षक बक्षीस देण्याचे ठरविले आहे. मोबाईल वर चांगले रिल्स व्हिडिओ बनवणे ही एक कला आहे आणि या कलेचा सन्मान करण्यासाठी प्रतिष्ठानने हा उपक्रम घेतला असल्याचे आयोजक अमित तोरडमल यांनी सांगितले.
या स्पर्धेत कोथरूड मधील शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित अखिल आझादनगर दहीहंडीचा उत्तम रील बनवणाऱ्या पहिल्या क्रमांकास ९९९९ रुपये, दुसऱ्या क्रमांकास ५५५५ रुपये तर तिसऱ्या क्रमांकास ४४४४ रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. बनवलेला रील व्हिडिओ तुम्हाला शिवगर्जना प्रतिष्ठानच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवायचा आहे.
जास्तीत जास्त लोकांनी यात स्पर्धेत सहभागी होऊन
मानकरी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. आज ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून शिवगर्जना प्रतिष्ठान चौक, आझादनगर, कोथरूड ही स्पर्धा सुरू होईल. अधिक माहितीसाठी 9075099187, 7822974967 यावर संपर्क करू शकता.
https://instagram.com/s.g.boys_kothrud?igshid=MzRlODBiNWFlZA==






