लता मंगेशकर यांना करोनाची लागण; उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल

मुंबई :गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली आहे. 92 वर्षीय लता मंगेशकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रीच कॅण्डीमधील आयसीयूमध्ये त्यांना ठेवण्यात आले असून उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती अशी माहिती मिळत आहे.
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. लता मंगेशक यांचं वय 92 वर्ष असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आल्याचं कळतंय

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि इतर काही आरोग्य विषयक समस्यांमुळं खबरदारी घेण्यात येत असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर यांचं वय पाहता होम क्वारंटाईन करणं शक्य नसल्यानं त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.









