पुणे शहर

गोखलेनगर ते कात्रज व पुणे स्टेशन बस सेवा पूर्ववत सुरू करा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळामध्ये शहरात सार्वजनिक वाहतूक करणारी पीएमपीएल बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र गोखलेनगर ते कात्रज व गोखलेनगर ते पुणेस्टेशन ही बस सेवा अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी ही बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी भाजपा व्यापारी आघाडी शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष विकास डाबी यांनी केली आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे यासाठी डाबी यांच्याकडून शिरोळे यांना पत्र दिले होते. शिरोळे यांनीही याची दाखल घेत पीएमपीएल प्रशासनाला बस सुरू करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.

आता बस सेवा सुरळीत सुरू झाली आहे. गोखलेनगरहून कात्रज व गोखलेनगर ते  पुणेस्टेशन जाण्यासाठी गोखलेनगर मधील नागरिकांना दोन , दोन बस बदलाव्या लागत आहे .गोखलेनगर मधील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन त्वरित गोखलेनगर ते कात्रज व गोखलेनगर ते पुणे स्टेशन बस सेवा पूर्ववत करणे आवश्यक असल्याचे डाबी यांनी सांगितले.

7 12
Screenshot 2020 10 12 12 19 40 67
Screenshot 2020 10 11 11 07 57 41 2
8

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये