पुणे शहर

महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ  ‘वामा वुमन्स क्लब’ चा शुभारंभ सोहळा संपन्न..

बाणेर : महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून पूनम विशाल विधाते यांच्या वतीने ‘वामा वुमन्स क्लब’ चा शुभारंभ सोहळा आज माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, ज्येष्ठ प्राध्यापक सुनीता पाडाळे,समाजसेविका ज्योती बालवडकर, समाजसेविका नीता जावळकर तसेच पत्रकार शितल बर्गे यांनी दीप प्रज्वलन करत ‘वामा वूमेन्स क्लबचे’ अनावरण करुन संपन्न झाला.

वामा वुमन्स क्लबच्या संस्थापक अध्यक्ष पूनम विशाल विधाते म्हणाल्या,खरंतर ‘वामा वुमन्स क्लब’ हा ग्रुप स्त्री शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी, तिच्यातील स्व: ची ओळख निर्माण करून देण्यासाठी सुरू केलेली छोटीशी सुरुवात पण, आज या कार्यक्रमाला तब्बल ७०० महिलांनी उपस्थित राहत हा केवळ एक महिलांचा ग्रुप नसून एक ‘महिलांची चळवळ’ आहे असे दाखवून दिले. जमलेल्या माझ्या सर्व माता-भगिनींना माझ्या स्त्री सक्षमीकरणाच्या या प्रयत्नाला दिलेल्या प्रोत्साहनासाठी सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानते.

Img 20240610 wa0014234599511973207107

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, कान, नाक, घसा तज्ञ व बाणेर, बालेवाडी डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. कविता चौधरी, बँक ऑफ बडोदा च्या वरिष्ठ व्यवस्थापिका वृषाली दरडे यांनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन केले.जमलेल्या सर्व महिलांना वामा वुमन्स क्लब ची आठवण म्हणून कॉफी मगचे वाटप करण्यात आले.

सर्व महिलांनी कार्यक्रमाच्या शेवटी गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरत मनसोक्त आनंद साजरा केला. तेजस्विनी भाले तसेच शोभा श्रीकांत यांनी देखील कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन करत, वत्सला शर्मा यांनी कार्यक्रमाची सांगता केली. ‘वामा वुमन्स क्लब’ माध्यमातुन महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत.

Fb img 17180177493908840309776594133677
Img 20240610 wa00003121272752325557053
Img 20240614 wa00026557655499595144585
Img 20240620 wa00182917479592532626119
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240607 wa00106155524562941881055
Fb img 17176807055063452256632276440792
Img 20240606 wa00116415178194496147748
Img 20240606 wa00121276257491443928373
Img 20240404 wa00162092919036315770776
Img 20240404 wa00132425955639205292116
Img 20240404 wa00127754739105663743070

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये