कोथरुड

दीवा जिम्नॅशियमच्या वतीने महीलांकरीता अद्ययावत जिम, दीपक मानकर यांच्या हस्ते उद्घाटन..

कोथरूड : दीवा जिम्नॅशियम वतीने महीलांकरीता सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत जीमचे उदघाटन नगरसेवक दीपक मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. मामासाहेब मोहोळ शाळेच्या जवळ ही जीम सुरू झाली आहे.

यावेळी दीवा प्रतिष्ठानचे हर्षवर्धन मानकर. जीमचे प्रशिक्षक योगेश सर आहीरे. कबड्डी प्रशिक्षक संगिता येनपुरे, दिलीप कानडे, भुषण शिर्के, दत्ता गायकवाड, विजय बाबर तसेच अनेक मुली व महिला उपस्थित होत्या.

दीपक मानकर म्हणाले, महिला वर्ग कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. महिलांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून त्यासाठी नियमित व्यायाम, योगा करणे आवश्यक आहे. दीवा जिम्नॅशियम ही चांगली संकल्पना आणली असून केवळ महिलांसाठी जिम सुरू करून त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये