कोरोना लसीच्या पुरवठ्या बाबत महापौर मोहोळ यांचा दावा खरा की खोटा ?

पुणे : पुण्याच्या महापौरांनी ट्विट करत पुणे शहरासाठी कोरोना लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात मात्र 1 लाख लसीच पुणे जिल्ह्यासाठी पोहोचल्या. यात महत्त्वाची बाब म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यासाठीच नव्हे, तर इतरही जिल्ह्यांसाठी लसींचा पुरवठा करण्यात आला. सातारा जिल्ह्यासाठी 35 हजार, सोलापूर जिल्ह्यासाठी 17 हजार अशा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.Is Mayor Mohol’s claim regarding supply of corona vaccine true or false?
पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या लसींमध्ये काही भाग हा ग्रामीण भागासाठीही राखीव असणार आहे. ज्यामध्ये 30 हजार शहरासाठी आणि 20 हजार डोस पिंपरी चिंचवड शहरासाठी देण्यात येणार आहे. परिणामी ज्या प्रक्रियेनं लसींचा पुरवठा करण्यात आला होता, तीच प्रक्रिया पुन्हा अवलंबण्यात आली आहे. इथं महत्त्वाची बाब अशी, की राज्य शासनाकडूनच हा लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळं महापौरांच्या दाव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

महापौरांनी केंद्र सरकारकडून पुण्याला रातोरात जवळपास अडीच लाख कोरोना लसीच्या डोसची व्यवस्था करुन दिली. असे ट्विट करित कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या पुण्याचा अधिक लसींची गरज आहे, यात कुणाचंही दुमत नाही. पण, त्यातच मुंबई आणि इतर शहरांमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत असताना लस पुरवठ्याच्या बाबतीत पुण्याला प्राधान्य देत केंद्रानं दुजाभाव केला आहे का, असा सवाल महापौर मोहोळ यांच्या ट्विटर पोस्टनंतर उपस्थित केला गेला.
धन्यवाद, @narendramodi सरकार !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 9, 2021
केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत.






