पुणे शहर

कोथरुड मधील पौड रस्ता परिसरात कोरोना रुग्णाचा घरीच मृत्यू ; धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या पत्नीला हलवले नायडू हॉस्पिटलमध्ये..

कोथरूड : कोथरूड मधील पौड रस्ता परिसरातील हनुमाननगर येथे राहणाऱ्या एका कोरोना बाधित व्यक्तीचा घरीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे पुढे आले आहे. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी ही घरातच बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली आहे. Corona patient dies at home in Paud Road area in Kothrud

या घटनेनंतर स्थानिक नगरसेवक दीपक मानकर यांचे स्विय सहाय्यक दिलीप कानडे व कार्यकर्ते घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी संबधित यंत्रणेशी संपर्क करून बेशुद्ध महिलेला नायडू हॉस्पिटल मध्ये हलवले आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार संबंधित मृत व्यक्तीने सोमवारी कोरोना टेस्ट केली होती त्यानंतर गुरुवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र ही व्यक्ती घरीच उपचार घेत होती का बेड न मिळाल्याने घरी होम क्वारंटाईन झाली होती याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. आज प्रकृती जास्त बिघडल्याने या व्यक्तीचा घरीच मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोना ची टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोर्ट वेळेत मिळत नसल्या च्या तक्रारी येत आहेत. टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट यायला दोन ते तीन दिवस लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीची परिस्थिती गंभीर होत आहे त्यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका वाढला आहे. याबाबतीत पालिका प्रशासनाने योग्य तो निर्णय तातडीने घेणे आवश्यक बनले आहे.

IMG 20210408 WA0012
Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close