पुणे शहर

‘जम्बो’त शुक्रवारपर्यंत आणखी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध होणार


पुणे : जम्बो रुग्णालयात आणखी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करून देण्याचा युध्दपातळीवर प्रयत्न सुरु असून आज जम्बोच्या आवारात बैठक घेऊन एकूण स्थिती, उपाययोजना आणि बेड्सची संख्या वेगाने वाढवण्यासंदर्भात चर्चा केली. येत्या शुक्रवारपर्यंत आणखी काही ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

या बैठकीस विभागीय आयुक्त सौरव राव, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त अगरवाल यांच्यासह पीएमआरडीए चे अधिकारी, डॉक्टर्स आणि संबंधित एजन्सीजचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, जम्बोतून अलीकडच्या काही दिवसात एकही रुग्णाला दुसरीकडे उपचारांसाठी हलवले गेले नाही. तसेच जम्बोतून बरे झालेल्या रुग्णांचीही वाढत हे आशादायी चित्र समाधान देणारे आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये