
पुणे महापालिकेचे मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटल अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसाठी वैद्यकीय सुविधांचे केंद्र झालेले आहे. या हॉस्पिटलमध्ये गेलं की मंगळवार पेठ, सोमवार पेठ, रास्ता पेठ, कसबा पेठ या पेठांमधील जुन्या लोकांना कै. शोभाताई बारणे यांची आठवण येते.
हे हॉस्पिटल सुसज्ज व्हावे, इमारत मोठी व्हावी. येथे आपत्कालीन उपचारांपासून अन्य विविध उपचार व्हावेत याकरिता शोभाताई बारणे यांनी अत्यंत चिकाटीने पाठपुरावा केला, लोकांना आणि प्रशासनाला विश्वासात घेतले. पाठपुरावा करताना संघर्ष करावा लागला तोही त्यांनी केला आणि आपल्या नगरसेवक पदाच्या काळात एक-एक सुधारणा त्यांनी करुन घेतल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण आल्यावर दोन वेळा महापालिकेवर निवडून आलेल्या शोभाताईंचे निधन अकाली झाले.

पण, त्यांचे हॉस्पिटल उभारणीतील योगदान जनतेच्या स्मरणात राहिले. नूतन इमारतीचे उदघाटन झाले त्यावेळी शोभाताई हयात नव्हत्या. महापालिकेच्या फलकांवर, जाहिरातीत शोभाताईंच्या नावाचा उल्लेख कुठेच नव्हता, त्यामुळे उदघाटनापूर्वी स्थानिक लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन करुन हॉस्पिटलच्या श्रेयनामावलीत शोभाताईंचा उल्लेख करायला महापालिकेला भाग पाडले.
एखाद्या नगरसेवकाने प्रामाणिकपणे जनतेच्या हिताचे खरोखरच भरीव काम केले तर, जनता प्रदीर्घकाळ त्यांचे योगदान स्मरणात ठेवते. त्याची साक्ष देणारे हे उदाहरण आहे. शोभाताई बारणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या आणि त्यांनी कामात आधुनिक दृष्टिकोन ठेवला. मंगळवार पेठेतील महापालिकेच्या शाळेतील मुलींना संगणक प्रशिक्षण देण्याची सोयही त्यांनी करुन दिली होती.
राजेंद्र पंढरपूरे (जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक)
सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/
सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/
सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/
सिंहासन NEWS– ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से https://www.sinhasannews.com/chakra-for-the-blessings-of-the-astrologer-maharaj-8683/
सिंहासन NEWS– गणपुलेंसाठी शरद पवारांची पदयात्रा https://www.sinhasannews.com/sharad-pawars-walk-for-ganapule-8848/
सिंहासन NEWS– महापालिकेची पोटनिवडणूक गिरीश बापटांना लाभली. https://www.sinhasannews.com/municipal-corporation-by-election-was-won-by-girish-bapat-8903/
सिंहासन NEWS– ‘पंजा’ चिन्हावर देशात पहिला विजय मिळविणारे प्रकाश ढेरे https://www.sinhasannews.com/prakash-dhere-who-won-the-first-victory-in-the-country-on-the-paw-symbol-8957/



