पुणे शहर

कर्वे समाज सेवा संस्था पथनाट्यातून करणार व्यसनमुक्ती साठी जनजागृती

पुणे : केंद्रीय समाज कल्याण मंत्रालयातर्फे नशा मुक्त भारत अभियानासाठी पुण्यातील कर्वे समाज सेवा संस्थेची करण्यात आलेली निवड अभिमानास्पद असून आम्ही ही मोहीम यशस्वी करू असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी आणि त्यांनी व्यसनापासून दूर रहावे यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेचे विश्वस्त संदीप खर्डेकर म्हणाले की,
कर्वे समाज सेवा संस्थेतील विद्यार्थ्यांनी प्रा. चेतन दिवाण आणि प्रा. महेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पथनाट्य बसविले असून त्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आम्ही विशेष करून महाविद्यालयीन युवक युवतीं मध्ये जनजागृती करणार आहोत. विशेषतः विद्यार्थ्यांकडे पालकांचे होतं असलेले दुर्लक्ष, सोशल मिडीयाचा प्रभाव,जीवघेणी स्पर्धा आणि एकाकीपणा यामुळे व्यसनाकडे तरुण तरुणी ओढले जातात याबाबत पथनाट्यातून जागृती केली जात आहे. गोपाळकृष्ण गोखले चौक ( डेक्कन जिमखाना ) येथील कलाकार कट्ट्यावर ह्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

Img 20220801 wa0304

या प्रसंगी डेक्कन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, कर्वे समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक, विश्वस्त संदीप खर्डेकर, सचिव शिवकुमार, व्यवस्थापन मंडळ सदस्य वैजीनाथ बिरादार, व्यवस्थापन मंडळाचे समन्वयक प्रसाद कोल्हटकर, प्र. संचालिका डॉ शर्मिला रामटेके, कार्यक्रम नोडल अधिकारी प्रा. चेतन दिवाण, सी एस आर सेल प्रमुख प्रा. महेश ठाकूर तसेच संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व अभ्यासक्रमांचे विद्यार्थी व पुणेकर  नागरिक उपस्थित होते.

Fb img 1647413711531

यावेळी तीन पथनाट्य सादर करून नशा मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवापर्यंत कर्वे समाज सेवा संस्थेच्या वतीने शहरातील सर्व महाविद्यालये व प्रमुख चौकांमध्ये नशा मुक्ती संदर्भात जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रा. चेतन दिवाण व प्रा. महेश ठाकूर यांनी स्पष्ट केले.

पथनाट्याचे दिगदर्शन मुक्ता ढवळे, साक्षी काळे आणि कौस्तुभ ओव्हाळ यांनी केले असून समाजकार्य व समुपदेशन अभ्यासक्रमाच्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी पथनाट्यचे उत्कृष्ट सादरीकरण करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये