पुणे महापालिकेचे ख्रिसमससाठी निर्बंध लागू…

पुणे : ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने उपाययोजना आखण्यास सुरूवात केली असून नाताळच्या सणासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत.आरोग्याच्यादृष्टीने खबरदारी म्हणून नाताळचा सण मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साजरा करणे अपेक्षित आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्के पर्यंत लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहाण्यास परवानगी असेल, चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्स राखले जाईल तसेच मास्क आणि सॅनिटायझर वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुती गीत गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा समावेश असावा शिवाय वेगवेगळ्या माईकचा वापर गायकांसाठी केला जावा, चर्चच्या परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नयेत, फटाके उडवू नयेत, मिरवणुका काढून नयेत, अशी बंधने आदेशाद्वारे घालण्यात आली आहेत.
या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास आपली व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.




