पुणे शहर

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातल्या हॉटेलमध्ये आग, आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

पुणे : मार्केट यार्ड परिसरात मध्यरात्री एका हॉटेलमध्ये आग लागली. यामध्ये दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एका कामगावर रुग्णालयात उपचार सुरू आहे मार्कटयार्ड मधील गेट नंबर 1 इथं रेवणसिद्ध नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. मुन्ना राठोड आणि संदीप या दोन कामगारांचा आगीत मृत्यू झाला.

मार्केटयार्ड परिसरातील  दोन मजले असणाऱ्या इमारतीत हॉटेलमध्ये आग लागली होती. शटर आतमधून कुलपाने बंद असून तीन कामगार पोटमाळ्यावर अडकले होते.  जवानांनी तातडीने बोल्डकटर या अग्निशमन उपकरणाने शटर तोडून आतमध्ये पोटमाळ्यावर प्रवेश केला आणि आगीवर पाण्याचा मारा केला.  आगीमध्ये अडकलेल्या तीन कामगारांना जखमी व बेशुद्ध अवस्थेत तत्परतेने बाहेर काढून शासकीय रुग्णवाहिका क्रमांक 108 मधून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र दोन कामगारांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून अद्याप  आगीचे कारण समजले नाही.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

आग तळमजल्यावरील भटारखान्यातून सुरू झाली व मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वात आधी आग आणखी पसरु नये यासाठी दक्षता घेतली. सर्वात प्रथम हॉटेलमध्ये असलेले 4 सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मध्यरात्री  1 वाजून 8 मिनिटानी  अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मार्केटयार्ड, गेट नंबर एक, हॉटेल रेवळ सिद्धी येथे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळली. माहिती मिळताच  गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि मुख्यालयातून एक फायरगाडी व जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. 

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये