कोथरूड राष्ट्रवादी युवक चे सभासद नोंदणी अभियान युवकांचा भरघोस प्रतिसाद.

कोथरूड : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी बापूंच्या पवित्र स्मृतीस वंदन करून त्यांच्या विचारांच्या प्रचार व प्रसारा हेतू राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून सरचिटणीस पुणे शहर गिरीश गुरनानी यांनी सभासद नोंदणी अभियानाचे आयोजन कोथरूड वनाज कॉर्नर येथे केले होते.
या उपक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन दीपक मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलत असताना हर्षवर्धन मानकर यांनी या उपक्रमाची प्रशंसा करत गिरीश गुरनानी यांचे ही मनापासून कौतुक केले. गुरनानींच्या कार्या बद्दल बोलत असताना त्यांनी हे नमूद केले की आजचा युवक हाच देशाच्या भविष्याचा पाठीचा कणा आहे आणि याच युवकांना संघटित करण्याचे भीष्म प्रयास गुरनानी अगदी प्रामाणिकपणे करत आहेत. अनेक प्रकारच्या सामजिक कार्य करत असलेल्या युवकांमध्ये गुरनानीचे नाव नेहमीच अग्रेसर असते असे ही त्यांनी गर्वाने सांगितले.
युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा मुळे सत्तर पेक्षा अधिक सभासदांची नोंदणी करून उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर ,विद्यार्थी अध्यक्ष विक्रम जाधव कार्याध्यक्ष शुभम माताळे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



